vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

नवी मुंबई, प्रतिनिधी- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघर, नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणार आहे. तरी या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आली.     नवी मुंबई, खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे 21 डिसेंबर 2025 रोजी शहिदी समागम शताब्दी या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते आरम्भता की “अरदास” करुन करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री. जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे श्री. चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ), उपस्थित होते. सिंग समाजाचे अध्यक्ष लड् राम नागवाणी, निमंत्रक तथा राज्यस्तरीय समिती तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे मिंलकित सिंग बल, उपजिल्हाधिकारी रायगड रविंद्र राठोड यांची उपस्थिती होती.

    ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघर, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होत असून आपण भाग्यवान आहोत की, या कार्यक्रमाचे नियोजनाची संधी आपल्याला मिळाली आहे. या कार्यक्रमाला शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणार आहे. प्रशासनाच्या समन्वयाने या शहिदी कार्यक्रम उत्साहात होणार असल्याची ग्वाही देत जिल्हाधिकारी श्री. जावळे म्हणाले की, या शहिदी कार्यक्रमामुळे श्री गुरु तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतिक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रध्देचा गौरव करण्यात येणार आहे. या समागम कार्यक्रमामुळे सदर समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरु बंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

  यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बलकित सिंग म्हणाले की, युवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांचे कार्य पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर, नवी मुंबई येथील खारघर येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी आपल्या सर्वांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वी करुया, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

000 000

संबंधित पोस्ट

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

आश्रमशाळा शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर आयुक्त यांच्यासोबत बैठक..

vishwatmaklokswamivarta

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ