vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

बुलडाणा, प्रतिनिधी-येथील राजे संभाजी नगर स्थित श्री संत गंगामाई स्थापीत जागृत श्री दत्त मंदीर येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीदत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरीञ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची आज (दि.६) डिसेंबर रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

   श्री दत्त मंदीर येथे (दि.२८) नोव्हेंबर ते (दि.५) डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी ८ ते १० श्री सत्यदत्त पुजा व अभिष्ज्ञेक, सप्तशक्ती पाठ, सकाळी १० ते दुपारी ३ श्री गुरुचरिञ पारायण व सायंकाळी ६.३० ते ७ नामस्मरण, आरती. (दि.२८) नोव्हेंबर रोजी ३ ते ६ श्रीराम जानकी महिला भजनी मंडळ बुलढाणा, रात्री ८ ते १० पो.कॉ. श्रीकृष्ण चव्हाण व सहकारी धामणगाव बढे, (दि.२९) नोव्हेंबर दुपारी ३ ते ६ श्री गजानन महिला भजनी मंडळ आणि संच, रात्री ८ ते १० सुयोग भजनी मंडळ आणि संच यांचे किर्तन, (दि.०४) डिसेंबर रोजी श्री गणपती मंदीर सराफा लाईन बुलढाणा यांची काकड आरती पार पडली. सायंकाळी ४ ते ६ हभप अनंत महाराज चिंचोळकर यांचे दत्तजन्म उत्सव व त्यानंतर सायंकाळी ५.४६ वाजता पालखी मिरवणूक, पाळण व आरती, सायंकाळी ७ ते १० मिरवणूक, (दि.०५) डिसेंबरला दुपारी ४ ते ६ गोपाळकाला प्रित्यथ हभप अनंत महाराज चिंचोळकर बुलडाणा यांचे काल्याचे किर्तन पार पडले. आज शनिवारी (दि.०६) डिसेंबर रोजी श्री गुरुचरीञ पारायण सप्ताहाची वरण, भात, पोळी, भाजी, गोड शिऱ्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात करुन सांगता करण्यात आली. यावेळी असंख्य दत्त भक्तगण व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळ्याला श्रीदत्त मंदीर ट्रस्ट, बुलडाणा व समस्त दत्त भक्तगण मंडळींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

श्रीगणेश म्हणून सुपारीची पूजा का केली जाते..?

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

*💐🙏प्रभात पुष्प🙏🌹

जय गुरुदेव श्री १०८ ष.ब्र डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या “महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे मानद प्रमुख” विद्यापीठ प्रशासनाने ज्ञान तपस्वी श्रद्धेय डॉक्टर वीरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी आपली निवड…

गुरुतत्वाचार

vishwatmaklokswamivarta

श्रीशिवलीलामृत* 🌹             ( मराठी रूपांतर ) *अध्याय तिसरा* *कल्माषपाद कथा, गोकर्ण-माहात्म्य, चाण्डाल स्त्रीचा उद्धार*