vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

 

जालना, प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यानुसार जालना शहरातील महापालिका निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे,रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग, होर्डीग्ज इत्यादी लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादीबाबी नियंत्रीत करणे आवश्यक आहे. ज्या अर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये उक्त ठिकाणी आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत वरीलप्रमाणे कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आज मुंबईत महाशिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

विशेष सखोल पुनरीक्षण 2026′ (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे  –जिल्हाधिकारी किशन जावळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

आश्रमशाळा शिक्षकांना एकस्तर पदोन्नती योजना सुरू,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश..

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस