vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, रक्कम रु. एक लाख पर्यंतच्या रक्कमेची थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. तरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रुपेश दळवी यांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम रु. एक लाख लाख करण्यात आली असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा रु.८५००० (८५%), अनुदान रक्कम रु.१०००० (१०%), अर्जदाराचा सहभाग रु.५००० (५%) असे एकूण १००००० (१००%), ३ वर्ष (३६ महिने) या कालावधीसाठी द.सा.द.शे.४% व्याज दराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांना रक्कम रु.१ लाख पर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघु उद्योग करता येतील.

तरी गरजु व होतकरु इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना एम.आय.डी.सी. रोड बॉम्बे रेस्टॉरंट जवळ, सातारा येथे मुळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रांसह स्वतः उपस्थित रहावे. जिल्हा कार्यालय सातारा मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेसह दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

000

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल डॉ. संजय लाखेपाटील यांची मािहती

vishwatmaklokswamivarta

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न 

मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजना यापुढेही यशस्वीरित्या सुरु राहील. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..