vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12:15 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यासाठी, भारत सरकार देशभरात विविध सहभागी कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. साहिबजादे यांच्या विलक्षण धैर्याबद्दल आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल नागरिकांना माहिती देणे आणि शिक्षित करणे, तसेच भारताच्या इतिहासातील तरुण वीरांच्या अदम्य साहस, त्याग आणि शौर्याचा सन्मान व स्मरण करणे हा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमांमध्ये कथाकथनाचे सत्र, काव्यवाचन, भित्तिपत्रक बनवणे आणि निबंध लेखन स्पर्धांचा समावेश असेल. हे कार्यक्रम शाळा, बाल संगोपन संस्था, अंगणवाडी केंद्रे आणि इतर शैक्षणिक मंचांवर, तसेच MyGov आणि MyBharat पोर्टलद्वारे ऑनलाइन माध्यमांतून आयोजित केले जातील.

9 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पूरब प्रसंगी, 26 डिसेंबर हा दिवस गुरु गोविंद सिंग जी यांचे सुपुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ म्हणून पंतप्रधानांनी जाहीर केला असून त्यांचे अतुलनीय बलिदान आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे.

या कार्यक्रमाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेतेदेखील उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

मुंबई महानगरपालिकेत आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट!मुंबईतही आमदार बांगरांची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; सायन-कोळीवाड्यात स्टार प्रचारक म्हणून झंझावाती प्रचार..

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापकसहभागासाठी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस… जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘वाईल्ड ताडोबा’ माहितीपटाच्या ट्रेलरचे आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या पुरस्काराचे वितरण