vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक* तंत्रज्ञानाचा वापर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक* तंत्रज्ञानाचा वापर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा प्रतिनिधी : भारत देश शेतीप्रधान असल्याने देशाची आर्थिक स्थिती शेतीवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पन्न दुप्पट करावे. आपल्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीतही हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कृषी विभाग व शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांचे संयुक्त विद्यमाने स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवार, शेती उत्पन्न बाजार समिती, कराड येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्व्. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उदयसिंह पाटील उंडाळकर,विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे उपस्थित होते.

स्व. विलास पाटील उंडाळकर यांनी दूरदृष्टी ठेवून कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या प्रदर्शनाचा सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. दरवर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर केलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे दिले आहेत. शेतकरी सबळ झाला तर देश ही सबळ होईल असा विश्वासही पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला. खासदार श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नफ्यातून दोन कोटी या

ठेवले आहेत. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 2 हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बारामती कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यमातून शेताला पाणी, खत किती द्यावे तसेच वातावरणातील बदलाची माहिती ही रोजच्या रोज दिली जाते. तरी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर करून आर्थिक प्रगती करावी,असे आवाहनही यांनी केले

या कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपजिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रिक, तहसीलदार कल्पना ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच कराड पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

पश्चिम बंगाल भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीने पक्षाला केला रामराम

vishwatmaklokswamivarta

राज्य एसटी महामंडळाबद्दल दोन महत्त्वाच्या घडामोडी, राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय

vishwatmaklokswamivarta

विलेपार्ले पश्चिम येथील LIC इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या मुहूर्तांमुळे मुंबई विभागातील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू