vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

    अमरावती, प्रतिनिधी: भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी केले आहे.

    या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण (किंवा समतुल्य) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीतील कामगिरी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विमा क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानावर आधारित केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम (NSC किंवा KVP स्वरूपात) जमा करावी लागेल. प्रशिक्षणांनंतर उमेदवारांना सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल. मात्र, नियुक्तीच्या तीन वर्षांच्या आत आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच हा परवाना कायमस्वरूपी केला जाईल.

    ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती – 444620 येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. निवड प्रक्रियेबाबतचे अंतिम अधिकार भारतीय डाक विभागाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळांचे ऑडिट करणार– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अधिक निधीसाठी शासन प्रयत्नशील.

श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची, नास्तिकतावादाची नाही !

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

vishwatmaklokswamivarta

ग्राम महसुल अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळानव्या प्रणालींच्या कार्यपद्धती जाणून घ्या- विभागीय आयुक्त दिलीप गावडे०ग्रामिण भागात लोकांना प्रभावी सेवा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

vishwatmaklokswamivarta