vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

    अमरावती, प्रतिनिधी : वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

   शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ 26 डिसेंबर हा दिवस सन 2022 पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.

  बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 

000000

संबंधित पोस्ट

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्री श्री क्षेत्रीय आळंदी ते श्रीक्षेत्रीय पंढरपूर माझे पंढरपुर.. केशव महाराज व सदानंद महाराज दिंडी सोहळा…

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस