vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

सांगली, प्रतिनिधी : बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षण / बालगृह या दोन्ही बालगृहांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, विजय कांबळे आणि अश्विनी माळी, दादासाहेब जाधव आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, बालनिरीक्षणगृहातील मुलांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. या वस्तुंची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात आली. तसेच, बालनिरीक्षणगृहातील मुलांसाठी Applus Idiada आणि Worship Earth foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांची रोबोटिक सेन्सर व ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) शिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बालनिरीक्षण गृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तुंची पाहणी करून माहिती जाणून घेतली. मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच, भविष्यात मुलांना काय व्हायला आवडेल, हे जाणून घेऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच, वसतिगृहांची पाहणी केली.

दरम्यान बालसंरक्षण कक्षातर्फे बालविवाहमुक्त महाराष्ट्र आपला – संकल्प अभियान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बालनिरीक्षणगृहात प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते वीर बाल दिवसनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात वीर बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईकरांसाठी खुशखबर – दिवाळीत म्हाडाच्या घरांची विक्री – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज सुरू

vishwatmaklokswamivarta

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta