vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

     अमरावती, प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात ‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे विशेष अभियान 24 डिसेंबरपासून सुरू झाले असून 10 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

     या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृहे, क्लब हाऊस आणि रिसॉर्ट्स इत्यादी आस्थापनांची कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीसोबतच संबंधित आस्थापना चालकांसाठी सुरक्षित अन्नाबाबतच्या सवयी आणि नियमांबाबत सभा व कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

       नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे. या मोहिमेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

राज्य सरकारने आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी – राजेंद्र कांबळे अध्यक्ष, जय जवान जय किसान संस्था

धीरज परदेशी हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी 

डिजीटल युगात विद्यार्थ्यांची मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta