vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

📍 बीड प्रतिनिधी-बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याअंतर्गत जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचे भूमिपूजन, टेनिस कोर्टाचे उद्घाटन, यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘दिवाळी नवीन घरात’ उपक्रमाचा समारोप, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, ध्वज निधी संकलनात बीड जिल्हा राज्यात प्रथम आल्याने सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळाही या एकाच ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. बीड शहरातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या #सहकार भवन इमारतीचा भूमीपूजन सोहळादेखील श्री. पवार यांच्या हस्ते पार पडला.

#बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासीयांना केले. जनतेच्या पैशातून होत असलेली विविध विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, यावर बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.

या कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार बजरंग सोनवणे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा