vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  राज्य प्रतिनिधी- आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलीसांच्या कुटूंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृह निर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलिसांच्या मुलांना चांगले वातावरण मिळावे, त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेक वेळा तासंतास सेवा बजावणारे पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावे या दृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यापूढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री. शशिकांत शिंदे, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये जवळपास 698 सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहूपर्यायी सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2014 ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आहे. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलीसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थीतीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यालायक घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पाचे उत्तमप्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावी, विलास बिरारी यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी बहूसंख्येने पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

 000

संबंधित पोस्ट

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta