vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता दि.5 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत भारत सरकारच्या PM-YASASVI (Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India) या एकत्रित शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. याकरिता राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांनी NPS (National Scholarship Portal) करिता अर्ज सादर करावेत असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.

प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी :- लागू प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएन्टी,डीएनटी, एसबीसी, शाळा शासनमान्य असणे आवश्यक, वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2 लाख 50 हजार, किमान उपस्थिती 75 टक्के, इतर शिष्यवृत्ती घेता येणार नाही, शिष्यवृत्ती रक्कम रु.4 हजार वार्षिक, दोन मुलांपर्यत लाभ (मुलींसाठी मर्यादा नाही.).

पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता 11 वी ते पदव्युत्तर/व्यावसायिक अभ्यासक्रम :- लागू प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएन्टी,डीएनटी, एसबीसी, वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2 लाख 50 हजार, किमान उपस्थिती 75 टक्के, एफआरए/मान्य प्राधिकरण मान्य अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती, रक्कम डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात, अभ्यासक्रम मध्यंतरी सोडल्यास शिष्यवृत्ती रद्द व रक्कम परत करावी लागेल

अर्ज प्रक्रिया NPS (National Scholarship Portal), विद्यार्थ्यांना https:// scholarship.gov.in, या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक. अर्ज करताना जात प्रमाणपत्र, जातवैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार लिंक बँक खाते,बोनफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, Aadhar Authenticated Attendance-75 टक्के ही कागदपत्रे आवश्यक आहेत

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांनी शिष्यवृत्तीचे अर्जत तात्काळ व अचूक भरावेत. सर्व शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे, सर्व पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत.

००००००

संबंधित पोस्ट

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या-आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम 23 एप्रिलला

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना-मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये छायाचित्र, छायचित्रण निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…