vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

            राज्य प्रतिनिधी : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.

  अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.     महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये अमरावतीसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

     मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान राज्याच्या क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

देवळाली येथील आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क गैरव्यवहाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta