vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी:- “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंड (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या कालावधीत सदर ठिकाणी दरबार साहिब असणार असल्याने भाविकांना कार्यक्रमस्थळी अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, यासाठी दि. १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विशेष श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

हा श्रमदान उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक एकात्मता व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र  वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा भव्य शुभारंभ यावर्षी ऐतिहासिक निरंकारी संत समागम सांगली नगरीत मुंबईसह महाराष्ट्रातून हजारो सेवादल व भक्तगण सेवेसाठी उपस्थित

vishwatmaklokswamivarta

भाव 2025- कला आणि संस्कृतीचामकाकुंभ*भारताच्या वर्षातील सर्वात मोठ्या कला आणि सांस्कृतिक संमेलनाविषयी तुम्हाला माहिती असण्याची 10 तथ्ये*_

vishwatmaklokswamivarta

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta