vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती• बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी

बुलडाणा/सिंदखेडराजा,( प्रतिनिधी: राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी असून या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखडा नव्याने तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्रमांक 7 येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

याप्रसंगी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, ऍड नाझेर काझी सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, पुणे विभागीयअधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

सागरी प्रशिक्षण संस्थांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा‘विकसित सागरी क्षेत्राशिवाय विकसित भारताची संकल्पना अपूर्ण’

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती