vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

एक अभूतपूर्व प्रतिसाद! खरोळा वासीयांच्या उदंड प्रतिसादासह प्रचार अभियानाचा झाला शुभारंभ… 🎊

 

लातूर प्रतिनिधी 📍 खरोळा

 

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीदरम्यान नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला. 🚩

या प्रचार रॅलीस खरोळ्यातील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारतीय जनता पक्षावरील विश्वास व्यक्त केला, तसेच आगामी काळात विकासाभिमुख नेतृत्वाला आपला पाठिंबा देण्याचा निर्धार दर्शविला. 🤝

या रॅलीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून खरोळा गावातील विविध प्रलंबित कामे, महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व येणाऱ्या काळात होणारी विकासकामे याबाबत माहिती दिली. खरोळा सर्कलला सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रतिनिधी मिळावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी भाजपा उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला.😍

पुढील 10 दिवसांवर आलेल्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूकीदरम्यान खरोळा सर्कलमधील प्रत्येक बुथप्रमुख, शक्तीप्रमुख तसेच भाजप कार्यकर्त्यांनी सतर्क राहून महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. गावातील नागरिकांच्या संपर्कात राहून, त्यांना आजपर्यंत आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वाखाली गावातील केलेल्या कामांची माहिती ध्यायची आहे. विजय हा विकासाचाच होईल, आणि तो विजय आपलाच आहे.” अशाप्रकारे आदरणीय श्री. ऋषिकेशदादा यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन समस्त बुथप्रमुख, शक्तीप्रमुख व कार्यकर्त्यांना केले.👏🏻

आजच्या ह्या प्रचार रॅलीमध्ये युवा नेते श्री. ऋषिकेश दादा कराड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. ओमप्रकाश गोडभरले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. नवनाथ (नाना) भोसले, श्री. विक्रमकाका शिंदे, ॲड. मनोज कराड, उद्योजक श्री. जगदीश कुलकर्णी तसेच खरोळा सर्कल मधील सरपंच, विविध सोसायटीचे मेंबर, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

खरोळा सर्कलचा सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ही एकत्रित साथ महत्त्वपूर्ण ठरेल हा मला विश्वास आहे. ✌🏻🪷 तुमची आमची – भाजपा सर्वांची 🪷

00000

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

नाशिक येथे महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न