vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला असून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सध्या १,८६,०१३ शिधापत्रिकांवर ७,७७,४५७ लाभार्थी आहेत, तर अंत्योदय अन्न योजनेत ६६,७३४ शिधापत्रिकांवर २,४८,९१६ लाभार्थी लाभ घेत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य देवराव भोंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नाना पटोले, प्रशांत ठाकूर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, धान्य वितरणाची प्रक्रिया ई-पॉस (e-PoS) मशीनद्वारे पार पाडली जात असून, अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार मे महिन्यातील वितरण प्रक्रियेमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच, केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे तिथे व्हिटॅमिनयुक्त (फोर्टिफाइड) तांदूळ पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील गरजू व गरिबांना वेळेवर आणि योग्य दर्जाचे अन्नधान्य मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असून, या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

****

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली

vishwatmaklokswamivarta

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे