vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना #लंगर वाढून केली सेवा

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना #लंगर वाढून केली सेवा

नांदेड, प्रतिनिधी :- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली.

जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे.

शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे    • जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा • शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश

स्वयं पुनर्विकासच मुंबईचे चित्र बदलेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता