vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

राज्य प्रतिनिधी-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना ‘दादा’ म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गुण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे. आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा-माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर..

vishwatmaklokswamivarta

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ प्रकरण जलद न्यायालयात चालविणे सर्व दोषींवर कारवाई  हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली

vishwatmaklokswamivarta