vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना-मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये छायाचित्र, छायचित्रण निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक..

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना-मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये छायाचित्र, छायचित्रण निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक..

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- मतदान व मतमोजणी केंद्रावरील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दक्षता घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 09 ऑक्टोबर 2025 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात सूचना दिल्या आहेत. कुठल्याही मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जावून पाहणी करणे किंवा छायाचित्रे,छायाचित्रण करणे, प्रतिबंधित आहे. मतदार मतदान करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा/निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक असेल. ते करतानाही मतदानाच्या गोपनीयतेच्या हक्काचे उल्लघंन होता कामा नये.

   प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेली प्रवेशिका रद्द करण्याचे अधिकार यथास्थिती संबंधित जिल्हाधिकारी अथवा निवडणूक निर्णय अधिकारी अथवा राज्य निवडणूक अधिकाऱ्यांस असतील. मतदान व मतमोजणी केंद्रावरील संबंधित अधिकारी/ कर्मचारी प्रवेशिकेची उचित पडताळणी करुनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान/मतमोजणी केंद्रावर प्रवेश देतील.

    कुठल्या मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, हे मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीप्रसंगी अपघाताने चित्रित झाल्यास किंवा त्याचे छायाचित्र काढल्यास त्याचे प्रसारण किंवा प्रसिद्धी करता येणार नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान/मतमोजणी केंद्रावर छायाचित्रासाठी किंवा छायाचित्रणासाठी कॅमेराचे स्टँड नेता येणार नाही. राज्य निवडणूक आयोग / संबंधित जिल्हाधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेला अधिकृत छायाचित्रकार किंवा कॅमेरामन यांनाच मतदान केंद्रात व मतमोजणी केंद्रात कॅमेराचे स्टँड नेता येईल. मतदान किंवा मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची एकाच वेळी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार गटागटाने सर्वांना आत सोडण्याबाबतचे किंवा परिस्थितीनुरुप नियोजन करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्ष यांना असतील.

    तरी सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000000

 

संबंधित पोस्ट

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा;मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

गावे हरित करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड..

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे