vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांच्या काळात जिल्ह्यात मनाई आदेश-परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसरात निर्बंध; झेरॉक्स दुकाने बंद राहणार

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांच्या काळात जिल्ह्यात मनाई आदेश-परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसरात निर्बंध; झेरॉक्स दुकाने बंद राहणार

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- फेब्रुवारी–मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या इयत्ता 12 वी व 10 वीच्या सार्वजनिक परीक्षांचा गैरप्रकारमुक्त व शांततेत कारभार पार पडावा यासाठी रायगड जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये (नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र वगळून) हा मनाई आदेश जारी केला आहे.

च्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा दि. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत. या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा वितरण केंद्रे व परीक्षा केंद्रांवर संबंधित निर्बंध लागू राहणार आहेत.

या मनाई आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या 24 तास आधीपासून परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच प्रत्येक पेपरच्या एक तास आधीपासून ते पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात फिरण्यास मनाई राहणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई व शिक्षा करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

खरीप हंगाम 2025 बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*