vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

जालना प्रतिनिधी आजच्या युगामध्ये पालक मुलांना आळशी बनवत आहेत. त्यांना परस्परावलंबी बनवत आहेत तर तसे न करता विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्नांना सामोरे जायची सवय लावा असे आवाहन त्यांनी पालकांना केले तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण हे फक्त वाहेरच नाही तर जालन्यामध्ये सुध्दा उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेऊन विद्यार्थी प्रगत होऊ शकतात असा ठाम विश्वास त्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिला.

श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कुल मध्ये ३१ जानेवारी २०२६ रोजी “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री व. स्था. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री सुदेशकुमारजी सकलेचा यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री गणेशजी अग्निहोत्री व गोसेवक व जेष्ठ श्रावक श्री चंद्रप्रकाशजी सकलेचा यांची उपस्थिती होती.

पुढे कार्यक्रमात प्रा. डॉ. अग्निहोत्री यांनी मुलांना चांगले शिक्षण देणे महत्वाचे असल्याचे पटवून दिले तसेच मुलांना त्यांचे कार्य स्वतः करण्याची सवय लावावी असे सांगितले.

पुढे कार्यक्रमात श्री व. स्था. जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष श्री भरतजी गादिया यांनी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है अस न राहता कुछ पाने के लिए कुछ करना पडता है असे आपल्या भाषणातून मुलांना पटवून दिले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शैक्षणिक वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रम श्री. स्था. जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष श्री.भरतकुमारजी गादिया, सहसचिव श्री.कचरूलालजी कुंकुलोल, सदस्य डॉ.श्री.गौतम चांदजी रुणवाल, सदस्य श्री.संजयकुमारजी मुथा, सदस्य श्री.संजयकुमारजी वाव, श्री.प्रकाशचंदजी सुराणा, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.संजयजी रुणवाल, सदस्य श्री.राजकुमार रुणवाल, सचिव श्री.राजकुमारजी रुणवाल, सदस्य श्री. श्री प्रशांतजी भंडारी, श्री विकासजी रेडासनी, श्री राहुलकुमारजी मांडोत, वीरेंद्रकुमारजी अलीझार, श्री विजयजी बाफना, श्री एम. एस. जैन मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.शांतिलालजी वानगोटा, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा एस.कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सौ.शोभना गोयल यांची उपस्थिती होती.

या भारत कल, आज और कल कार्यक्रमात इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून विविध गाण्यावर नृत्य सादर केली. रंगारंग कार्यक्रमाने जनसमुदायांची मने जिंकली.

तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी हे सुध्दा आर्वजुन विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी दाद देण्यास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी शोभना गोयल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे आभार व्यक्त केले.

00000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta