vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अकोला, प्रतिनिधी : आदिवासी विकास विभागातर्फे परदेशातील शैक्षणिक संस्थांत 2026-27 या वर्षात पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएडी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. उमेदवार व उमेदवाराचे आई,वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. उमेदवाराच्या पालकांचे,कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

विहीत निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत, तसेच विद्यापीठाची जागतिक क्रमवारी 300 पर्यंत शिथील केली जाईल. अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती आदी माहिती आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आदिवासी विकास आयुक्त लीला बनसोड यांनी स्पष्ट केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा–अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण,पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्ध – कुवेत एअरवेजचे विमान केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह घेऊन दाखल…