vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा

शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

 

अकोला, प्रतिनिधी: यंदा जिल्हा ग्रंथोत्सव अकोट येथील सांस्कृतिक कलाभवनात आज दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ग्रंथोत्सवात कथाकथन, परिसंवाद, कवीसंमेलन, ग्रंथप्रदर्शन अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल.

शुभारंभानिमित्त आज सोमवार, दि. 9 फेब्रुवारीला स. 10 वा. ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते स. 11 वा. होईल. ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार प्रतिमा इंगोले अध्यक्षस्थानी असतील. उद्घाटन सत्राला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दिवशी दु. 2 वा. ‘मला जिजाऊ व्हायचं’ हा एकपात्री प्रयोग सादर होणार असून, त्यानंतर ‘मराठी भाषेपुढील आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या अध्यक्षतेत होईल. दु. 4 वा. भाषावैज्ञानिक व व-हाडी बोलीचे अभ्यासक रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेत ‘सोशल मीडिया आणि वाचन’ या विषयावर परिसंवाद होईल.

मंगळवार, दि. 10 फेब्रुवारीला स. 10.30 वा. देशभक्तीपर गीतसंगीत कार्यक्रम, स. 11 वा. ‘आजचा वाचक, उद्याचा विचारवंत’ या विषयावरील परिसंवाद, दु. 12 वा. ‘वाचन संस्कृतीमध्ये ग्रंथालयांचे योगदान व भूमिका’ या विषयावरील चर्चासत्र होईल. दु. 2 वा. ‘आजच्या विद्यार्थ्यांपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होईल. दु. 3 वा. कवी डॉ. विठ्ठल कुलट यांच्या अध्यक्षतेत कवीसंमेलन होणार असून, प्रसिद्ध गझलकार गोपाळ मापारी निवेदन करणार आहेत. दु. 4.30 वा. समारोपाचे सत्र होईल.

जिल्ह्यातील वाचक, रसिक, कवीलेखक, ग्रंथप्रेमी नागरिकांनी ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta