vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाण्यात शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम

बुलढाण्यात शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम

बुलढाणा, प्रतिनिधी: सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंपूर्णतेकडे मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा मार्फत शेळीपालन, कुक्कुट पालन तसेच गाय/म्हैस पालन या विषयांवरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २४ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बुलढाणा येथे होणार आहे.

प्रशिक्षणामध्ये शेळी, कुक्कुट व दुधाळ जनावरांचे तंत्रशुद्ध पालन, विविध जाती व त्यांचे प्रकार, लसीकरण, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती, चार्‍याचे प्रकार यांसह उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय योजनांची माहिती आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

प्रवेशासाठी उमेदवार किमान ५ वी उत्तीर्ण, वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नोंदणी, प्रशिक्षण शुल्क व अधिक माहितीसाठी दि. २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क: ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१.

सदर आवाहन किशोर अंभोरे, विभागीय अधिकारी, MCED अमरावती यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*मंत्रिमंडळ निर्णय …

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

कोपरखैरणे परिसरात 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश*

महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण यात्रा 2025 चे ठाणे जिल्ह्यात उत्साहात स्वागत

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…