vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर शहरात रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दुपारी २.०० ते सायं. ६.०० या वेळेत पार पडणार आहे. सदर मेळाव्याचे आयोजन डोंगरदेव वधू-वर सूचक केंद्र यांच्या वतीने करण्यात आले असून, स्थळ आहे. मराठवाडा महसूल प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र, शासकीय दूध डेअरी जवळ, सामाजिक न्याय भवन, बंजारा चौक, छत्रपती संभाजीनगर. संस्थेच्या माहितीनुसार, डोंगरदेव वधू-वर सूचक केंद्राने आजपर्यंत तब्बल १४,७७१ विवाह जुळवून दिले असून, हजारो कुटुंबांना संसाराच्या नव्या वाटेवर मार्गदर्शन केले आहे. या यशस्वी परंपरेचा लाभ अधिकाधिक युवक-युवती आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेट, संवाद आणि माहिती देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुव्यवस्थित नोंदणी प्रक्रिया, स्वतंत्र कक्ष व्यवस्था आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहून या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्कासाठी कांतीलाल डोंगरदिवे 9881950754 / 8421102452 या नंबरवर कॉल करू शकता.

संबंधित पोस्ट

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास 15 ऑगस्टपासून सुरू

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट आरोपीविरोधात फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार; नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे दि.७ पासून प्रदर्शन