vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी..

राज्य प्रतिनिधी –

महाशिवरात्री 2026 निमित्त राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये लाखो भक्त महादेवाच्या दर्शनासाठी आले असून, मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. हर हर महादेव’च्या जयघोषात लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

दरवर्षीप्रमाणे रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास गवळी समाजाच्या वतीने परंपरेनुसार दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर महाशिवरात्री यात्रेस मोठ्या उत्साहात प्रांरभ झाला. यानंतर भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी लातूर शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

चंद्रपूर शहरातील झटपट नदीकाठावर असलेले सोळाव्या शतकातील अंचलेश्वर मंदिर आज महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या गर्दीने फुलले आहे

महाशिवरात्री 2026 निमित्त राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये लाखो भक्त महादेवाच्या दर्शनासाठी आले असून, मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र उत्साहात साजरा होत असून जालना जिल्हाभरात देखील महाशिवरात्रीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात महादेव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून आजच्या दिवशी भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घेतली आहे. पंचमुखी महादेव मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला गेलाय.महाशिवरात्रीच्या दिवशी मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिरात भस्म आरती पार पडली. 🕉️

महाशिवरात्री निमित्त नागपुरातील तीर्थक्षेत्र असलेल्या कल्यानेश्वर मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी सकाळ पासनच गर्दी केलेली दिसत आहे. मंदिरातील गर्भगृह देखील आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले आहेत. यावेळेला प्रसादाचे देखील मंदिरात आयोजन करण्यात आलेले आहे.

महाशिवरात्रिच्या पवित्र प्रसंगी हर-हर महादेवच्या जयकारांसह, गुजरातमधील श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे श्रद्धा आणि भक्तीने पंचामृताने भव्य अभिषेक होत आहे.मंदिर परिसरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. राज्यासह देशभरातून हजारो भक्त ‘त्र्यंबक राजा’च्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले असून पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी पुष्पमालांनी सजविण्यात आला आहे. यंदा महाशिवरात्रीनिमित्त मंदिर सलग ४१ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र रांग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय पथक, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.

#महाशिवरात्रि२०२६ #shivratri2026

आज महाशिवरात्री निमित्त देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ नगरीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच मंदिराबाहेर रांगा लावल्या आहेत. तर मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.महाशिवरात्रीचा मुहूर्त साधण्यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक परळीत दाखल झाले आहेत. रात्री १२ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले होताच ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर आणि परळी शहर दुमदुमून गेले. हातात बेल-फूल आणि पूजेचे ताट घेऊन भाविक तासनतास रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

000 0000

संबंधित पोस्ट

नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

विधानपरिषद लक्षवेधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि तपासणी प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी