vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वेब डिझायनिग वर आधारित एक महिना व १. सायबर सिक्युरिटी ॲण्ड डेटाबेस रिकव्हरी वर आधारित, ॲनिमेशन ॲण्ड ग्राफिक्सवर आधारित दोन महिने कालावधीचे अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा. तरी इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना येथे सुरेखा मोरे कार्यक्रम आयोजक, मो.9699334648 यांच्याशी संपर्क साधावा किंवा एमसीईडीच्या संकेतस्थळावर www.mced.co.in/Barti या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी

   प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक, अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल. या प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान दहावी शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार, रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. असेही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा पाया भरणीचा कार्यक्रम संपन्न. 

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

vishwatmaklokswamivarta