vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, प्रतिनिधी-

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.

00000

 

संबंधित पोस्ट

डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन कर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी- पालकमंत्री शंभूराज देसाई

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta