vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालना, प्रतिनिधी:- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल• ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन