vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक विभागाच्या विद्यानिकेतन धर्तीवर चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश देण्यासाठी १२ एप्रिल २०२६ रोजी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले आहे

नाशिक विभागांतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा (कॅम्प मवेशी), ता. अकोले व शासकीय आदर्श आश्रमशाळा देवमोगरा, ता. नवापूर, जि. नंदुरबार या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. या शाळांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार पुढील शैक्षणिक वर्षात ५ वीत प्रवेश दिला जातो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश मिळविण्यासाठी चालू शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) मध्ये चौथीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे कन्या विद्यालय, अकोले, ता. अकोले हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमाती व आदिम जमातीचे विद्यार्थी पात्र राहतील. प्रवेशार्थी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (रहिवासी) असणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखापेक्षा अधिक नसावे. सदर परीक्षेसाठीचे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) तसेच या कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले अर्ज आणि त्यासोबत पालकांचे मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी (अधिवास) प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड, तसेच विद्यार्थ्याच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे

000

 

संबंधित पोस्ट

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई महसूलमंत्र्यांचे परिषदेत आश्वासन

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम