vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी— मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, काही लाभार्थींनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत का किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का, या बाबत चुकीची नोंद झाल्याची प्रकरणे आढळली आहेत.

अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ही सुधारणा करण्याची सुविधा दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार असून याबाबतचा शासन निर्णय दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थी महिलांनी दिलेल्या कालावधीत आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

vishwatmaklokswamivarta

लेख – १ जुलै : राज्य कृषी दिन-हरित क्रांतीचे जनक – वसंतराव नाईक

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त