vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आता नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस – महापौर श्रीम. सुजाता पाटील

आता नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस – महापौर श्रीम. सुजाता पाटील

      नवी मुंबई प्रतिनिधी    जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच ख-या अर्थाने स्त्री सक्षमीकरण असल्याचे सांगत या पुढील काळात महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल असे स्पष्ट केले.

     या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या एनएमएमटी अर्थात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात पहिल्या टप्प्यात 400 महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत असल्याचे महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या करिता महिलांना बस चालकाचे संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी समाजविकास विभागावर देण्यात आली असून या विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने नवी मुंबईत वास्तव्य असणा-या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

     या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे नवे दालन नवी मुंबईत खुले होणार असून प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणा-या नवी मुंबईच्या उपक्रमांचे अनुकरण इतरही शहरात होईल असा विश्वास महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड…

भारत, यूके, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये झालेल्या प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६- दुबई’ला जागतिक प्रतिसाद! – दुबई जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वाधिक पसंतीचे केंद्र

vishwatmaklokswamivarta

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीत आरे-वारे समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या

vishwatmaklokswamivarta

महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन

vishwatmaklokswamivarta