vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनगणना 2027′ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.

‘जनगणना 2027’ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.

     अमरावती, प्रतिनिधी : आगामी ‘जनगणना 2027’ च्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध स्तरावरील जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दि. 16 ते 18 मार्च या कालावधीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    सदर प्रशिक्षण हे दि. 16 ते 18 मार्च या तीन दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. प्रशिक्षणात जिल्हा जनगणना अधिकारी, सर्व चार्ज जनगणना अधिकारी, शहर जनगणना अधिकारी, अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत जनगणनेच्या कामात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची नेमकी कर्तव्यांची माहिती दिली जाणार आहे. घरांची यादी तयार करणे, घरांची गणना करणे आणि सीएमएमएस आणि एचएलबीसी पोर्टलचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

     मुख्य जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षणाला जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta