vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत- पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती· जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ – जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा.

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत- पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती· जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ – जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा.

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरवरील साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा, शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्याचा तसेच नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती पणन जयकुमार रावल यांनी दिली.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे भारतातून जीसीसी देशांकडे होणाऱ्या फळे व भाजीपाला निर्यातीसमोर गंभीर संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जेएनपी आणि मुद्रा बंदरात अडकलेल्या फळे व फाजीपाला कंटेनरांवर तातडीने शुल्क माफी मिळावी व जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजरानी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांना तातडीच्या उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक दखल घेतली.जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) निर्यात कंटेनरवरील साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा तसेच शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही सवलत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १४ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत १५ दिवसांसाठी लागू राहणार आहे. ही सवलत २८ फेब्रुवारी रोजी टर्मिनलमध्ये असलेल्या तसेच ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत प्रवेश नोंद झालेल्या कंटेनरना लागू असेल.

याशिवाय जेएनपीए आणि टर्मिनल चालकांकडून काही महत्त्वाच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. जहाज उपलब्ध होईपर्यंत अडकलेल्या कंटेनरना कंटेनर साठवण आवारात साठवून ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधून इतर बंदरांमधून मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या कंटेनरना तात्पुरत्या पुनर्लोड मालवाहतूक म्हणून जेएनपीए येथे साठवण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाढत्या मालसाठ्यासाठी टर्मिनलना अतिरिक्त जागाही देण्यात आली आहे.

याशिवाय विलंबामुळे निर्यातदारांवर अतिरिक्त आर्थिक भारही वाढत होता. टर्मिनल विद्युत जोडणी शुल्क, थांबा विलंब शुल्क आणि विलंब दंड यांसारख्या खर्चांमुळे प्रत्येक सात दिवसांच्या विलंबासाठी प्रति कंटेनर सुमारे दोन लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येत होता.

सध्या सुमारे २५० कंटेनर जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे अडकून पडले आहेत, तर आणखी सुमारे १५० कंटेनर गुजरातमधील मुंद्रा बंदरावर थांबलेले आहेत.

००००

संबंधित पोस्ट

आण्णाभाऊ साठेंचा लढा नव्याने लढण्याची गरज , प्रस्थापिताविरोधात पेटून उठा – सतीश घागे.लहूजी सेनेचा जिल्हास्तरीय मेळावा: विधासभा निवडणुकीत घाटगे पाटलांना दिला जाहीर पाठींबा  

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष: पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती “जैसे थे ठेवा”, सिंघवींची मागणी

vishwatmaklokswamivarta

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिवस: अमित शहांनी वाहिली लोहपुरुष  सरदार पटेलांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta