vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

बुलढाणा प्रतिनिधी: ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बुलढाणा व कृषि विभाग बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राजमाता महोत्सव 2026” ची सोमवारी (दि. 9) उत्साहात सांगता झाली. हा महोत्सव दि. 5 ते 9 मार्च दरम्यान जिजामाता प्रेक्षागार, क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता.
महोत्सवाचा शुभारंभ दि. 5 मार्च रोजी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाला होता. समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे(धुळे) तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव आदी उपस्थित होते.
पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉल्ससोबतच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. सायंकाळी आयोजित मनोरंजनात्मक कार्यक्रमांनीही महोत्सवात रंगत आणली. विक्री अहवालानुसार पाच दिवसांत महिला बचत गटांच्या उत्पादनांमधून व फूड स्टॉल्समधून सुमारे 40 लाख 12 हजार रुपयांची विक्री झाल्याची नोंद आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा देत महिला उत्पादनांमध्ये वेगळेपण असणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक उत्पादनाचे वैशिष्ट्ये जपल्यास त्याची मागणी वाढू शकते, असे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांच्या उत्पादनांना ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत बिजोत्पादनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलेमुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कृषि विभागाने उभारलेल्या स्टॉल्सचे कौतुक केले. भविष्यात बुलढाणा जिल्ह्याच्या उत्पादनांचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करून त्या उत्पादनाला व्यापक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
समारोपावेळी 13 तालुक्यांमधून सर्वेक्षण अहवालानुसार निवडलेल्या उत्कृष्ट 10 उत्पादन गटांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यापैकी तीन गटांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सातपुडा उत्पादक समूहाच्या रजनी उमेश वेरूळकर यांच्या पेटीकोट उत्पादनाला मिळाला. त्यांना प्रशस्तीपत्रासह 10 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक नांदुरा तालुक्यातील वडाळी येथील समृद्धी महिला समूहाच्या प्रियंका मनोज वकटे यांच्या बॉलपेन व घासणी उत्पादनाला मिळाला. त्यांना 7 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील सावित्रीबाई फुले समूहाच्या पूजा नंदकिशोर देशमुख यांच्या पापड व चिप्स उत्पादनाला मिळाला. त्यांना 5 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाने महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या उद्योजकतेला चालना दिली.

00000

संबंधित पोस्ट

पर्यटन आणि संस्कृती विभागातील शासकीय ठरावांना स्थगिती, विद्यमान राज्य सरकारचा तत्कालीन मविआ सरकारच्या निर्णयास स्थगिती

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन· सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

मोरारी बापू यांची राम कथा ऐकणे म्हणजे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 15 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन

vishwatmaklokswamivarta