vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

मुंबई, प्रतिनिधी : गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू केली असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे

सदर प्रणालीद्वारे खेळाडूंना डिजिटल पडताळणीसह प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर असलेल्या QR कोडमुळे प्रमाणपत्राची सत्यता संबंधित नियुक्ती प्राधिकरण त्वरित तपासू शकतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंनी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घ्यावे, त्याचप्रमाणे जर एखाद्या खेळाडूची माहिती प्रणालीवर उपलब्ध नसल्यास support@kridaepramaan.org या ई-मेलवर स्पर्धेचे नाव, वर्ष आणि प्रमाणपत्राची स्कॅन प्रत पाठवून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर विभागस्तरावर पडताळणी करून अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.

सध्यस्थितीत कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. इतर खेळांचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेल्या खेळाडूंनी देखील पुढील भरती प्रक्रियेसाठी या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.00000

संबंधित पोस्ट

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची निवड.

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta