vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक बाबत चर्चा ,नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक बाबत चर्चा ,नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

– मुंबई प्रतिनिधी  मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे  आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा  भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. या संदर्भातच नारायण राणे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज दुपारी केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्र्यावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी नारायण राणे करणार आहेत.

मागच्या महिन्यात जनआशीर्वाद यात्रे दरम्यान कोकणात असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ज्या दिवशी त्यांना अटक झाली. त्याचदिवशी त्यांना जामीनही मिळाला होता

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. शिवसेनेने ठिकठिकाणी नारायण राणेंविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले होते.

संबंधित पोस्ट

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक 

vishwatmaklokswamivarta

मनीष सिसोदिया यांच्यावरील CBI छाप्यानंतर काही तासांतच 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे     -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे