vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता केंद्र सज्ज; प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत

ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता केंद्र सज्ज; प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी : राज्यातील क्रीडा संस्कृतीला व्यावसायिक व जागतिक दर्जाची जोड देण्यासाठी राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत लातूर विभागाला ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांच्या निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्राची मान्यता मिळाली असून, प्रतिभावान खेळाडूंना आता हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या केंद्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी दि.20 मार्च 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर येथे सुरू होणाऱ्या या निवासी केंद्रात ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन्ही खेळांच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार, अद्ययावत प्रशिक्षण साहित्य आणि देशी-विदेशी प्रशिक्षणाची सुविधा शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या सरावासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि करिअर मार्गदर्शनासारख्या आधुनिक सोयीही उपलब्ध करून दिल्या जातील.

अर्जासोबत अर्जदारांनी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, मागील 2 वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, बोनाफाईड सर्टिफिकेट, पालकांचे संमती पत्र आणि वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष सादर करावेत. किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवरही ऑनलाईन अर्ज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाची शेवटची तारीख 20 मार्च 2026 अशी आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद