vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

क्रिकेट प्रतिनिधी-

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना  आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर होती.

या सामन्यात-किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वरून टीम इंडियाचे अभिनंदन करून तमाम देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन… दिल्याच्या शुभेच्छा ट्विटरवर दिल्या

न्यूझीलंड क्रिकेट संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची अचूक गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर रोखला.

२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय फलंदाजांनी नेत्रदीपक फलंदाजीचे प्रदर्शन करत किवी गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. स्वतः पुढाकार घेत रोहित शर्माने कप्तानी खेळी खेळत स्फोटक अर्धशतक ठोकले. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल, अक्षर पटेल तसेच सर्वच फलंदाजांनी कर्णधाराला साजेशी साथ दिली. अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दणदणीत पराभव करत विजयश्री खेचून आणली. टीम इंडियाच्या या देदीप्यमान यशाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला नक्कीच सार्थ अभिमान आहे. तमाम देशवासीयांचे तसेच भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतीय क्रिकेट संघाला भावी क्रिकेटसाठी हार्दिक शुभेच्छा

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ—महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण..

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी बांगलादेशातील BNP सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार.