vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.“कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता ३२ हजार कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे. पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून ३२ हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत ८००० कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत. या आठवड्याअखेर १८,५०० कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.”

संबंधित पोस्ट

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta

सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स 00000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव• मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन…

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

vishwatmaklokswamivarta

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी