राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली प्रतिनिधी –
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, हा सण आत्मसंयम, दानधर्म आणि वंचितांविषयीची करुणा यांचा संदेश देतो. तसेच, हा सण प्रेम, बंधुभाव, शांतता आणि परस्पर सलोखा यांचाही संदेश पोहोचवतो. ईदचा हा सण आपल्याला याची आठवण करून देतो की, आपण सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.