vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा…

राज्य प्रतिनिधी-वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा…

भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा अखेर , नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सकाळीच त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चाकणकर यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाभव्य आणि मजबूत असावा- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा ३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta