vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित..

सोलापूर, प्रतिनिधी: जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यावतीने आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ चे उद्घाटन मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हा कार्यक्रम सरस्वती विद्यामंदिर, सोलापूर येथे पार पडला. कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे, देवसर तसेच इतर मान्यवर व भजनी मंडळे उपस्थित होती.

सर्वांचा आत्मा एकच असून मानवता हा एकच धर्म आहे. हे सर्व जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आणि तेही अतिशय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याचे भाषांतर केले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हे माऊलींचे विचार जगभरातील सर्व देशात पटवून देण्याचे कार्य केले जाईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की, “मोगरा फुलला या अभंगांमध्ये मानवी मनाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे. हा कार्यक्रम भारताबाहेर इतर देशात सादर करून ‘पसायदान’चे महत्त्व तेथील लोकांना पटवून दिले जाईल.कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर व धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता. अनुदानाचे धनादेश मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…