vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे आणि नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंवा असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी हॉटेल व व्यापारी संघटनांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करावेत असेही पालकमंत्री म्हणाले.

०००००००

संबंधित पोस्ट

मलकापूरमध्ये स्टेट बॅंकेची नवीन फॉरेक्स शाखा,उद्योजक, निर्यातदारांना दिलासा ; अकोल्याच्या चकरा थांबणार

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका ठाम, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला देणार नाही, ओबीसी नेत्यांनी गैरसमज करु नये – चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta