vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मलकापूरमध्ये स्टेट बॅंकेची नवीन फॉरेक्स शाखा,उद्योजक, निर्यातदारांना दिलासा ; अकोल्याच्या चकरा थांबणार

मलकापूरमध्ये स्टेट बॅंकेची नवीन फॉरेक्स शाखा,उद्योजक, निर्यातदारांना दिलासा ; अकोल्याच्या चकरा थांबणार

 

राज्य प्रतिनिधी : जिल्ह्यातील निर्यातदार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) विकासाला चालना देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मलकापूरच्या मुख्य शाखेत नवीन फॉरेक्स शाखा सुरु केली आहे. या शाखेचे मंगळवारी उद्घाटन झाले असून या नवीन शाखेमुळे आता जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदारांना फॉरेक्स सेवांसाठी अकोला येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

या विशेष फॉरेक्स शाखेसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याशिवाय, जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा आणि एसबीआयच्या बुलढाणा क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक मोहंमद इकबाल यांनीही योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना विशेष फॉरेक्स सेवांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निर्यातीत बुलढाणा जिल्हा अव्वल,गेल्या तीन वर्षांत अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा निर्यातीमध्ये अव्वल राहिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्यातून ४६५ कोटी रुपयांवर उत्पादनांची निर्यात झाली आहे. या नवीन फॉरेक्स शाखेच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.‘या’ सेवा मिळणार नवीन फॉरेक्स शाखेत परकीय चलन व्यवहार, व्यापार वित्त आणि निर्यात-आयात व्यवहारांसाठी सल्लामसलत यांसारख्या सेवा पुरवण्यात येणार आहेत. जागतिक व्यापार सुलभ करण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी एसबीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निर्यातदार आणि एमएसएमई प्रतिनिधींनी या विशेष सेवांचा लाभ घेण्यासाठी मलकापूर मुख्य शाखेला भेट देण्याचे आवाहन केले आहे. ही शाखा तज्ज्ञ कर्मचारी आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून जागतिक व्यापाराच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन फॉरेक्स शाखेच्या स्थापनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील व्यावसायिकांसाठी जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार असून स्थानिक उद्योगांना अधिक स्पर्धात्मक बनवण्यात मदत होणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आणि चौकशीसाठी एसबीआयच्या मलकापूर मुख्य शाखेला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी – मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यभर जाणवतोय 🌧️सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस. 

vishwatmaklokswamivarta

डिजीटल मार्केटींगवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची  जनमाणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta