vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

राज्य प्रतिनिधी-

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणारभारत निवडणूक आयोगाने (इसीआय) 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच 6 राज्यांतील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

2. इसीआयने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) निर्देश दिले आहेत की, प्रत्येक 2,18,807 मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (एएमएफ) आणि मतदानाच्या दिवशी मतदार सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

3. एएमएफ अंतर्गत पिण्याचे पाणी, सावलीसह प्रतीक्षा क्षेत्र, पाण्याची सुविधा असलेले स्वच्छतागृह, पुरेसे प्रकाश, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा मार्ग, मानक मतदान कक्ष आणि योग्य दिशादर्शक फलक यांचा समावेश आहे. तसेच, रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना विश्रांती घेता यावी यासाठी ठराविक अंतरावर बाक ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

4. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी, प्रत्येक मतदान केंद्रावर चार एकसमान आणि प्रमाणित मतदार सुलभता भीत्तीपत्रक (व्हीएफपी) ठळकपणे प्रदर्शित केले जातील. यामध्ये मतदान केंद्राची माहिती, उमेदवारांची यादी, करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी, मान्य ओळखपत्रांची यादी आणि मतदान प्रक्रिया यांचा समावेश असेल.

5. प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदार सहाय्य केंद्रे (व्हीएबी) स्थापन केली जातील. येथे मतदान केंद्र स्तर अधिकारी (बीएलओ) किंवा इतर अधिकारी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यात मदत करतील. व्हीएबीवर स्पष्ट दिशादर्शक फलक असतील आणि मतदान केंद्राकडे येताना ते सहज दिसतील

6. मतदारांच्या सोयीसाठी इसीआयने घेतलेल्या उपक्रमांपैकी एक म्हणून, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मतदार मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपला फोन (बंद अवस्थेत) नियुक्त स्वयंसेवकाकडे देऊ शकतात आणि मतदान केल्यानंतर तो परत घेऊ शकतात.

7. आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की एएमएफ आणि संबंधित सुलभता उपायांची अंमलबजावणी अनिवार्य आहे आणि सर्व मतदान केंद्रांवर त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मतदानाच्या तारखेपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून सर्व मतदारांना सुरळीत आणि आनंददायी मतदानाचा अनुभव मिळेल.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

विधानपरिषद लक्षवेधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही- राज्यमंत्री माधुरी मिसाळ