vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वीर यशवंतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा  –महिला व बालविकास मंत्री ना.कु.आदिती तटकरे,माणगाव येथे व्हिक्टोरीया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्साहात साजरी..

वीर यशवंतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा  –महिला व बालविकास मंत्री ना.कु.आदिती तटकरे,माणगाव येथे व्हिक्टोरीया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्साहात साजरी..

 

 

राज्य प्रतिनिधी

रायगड,:- शहीद विर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास आजच्या भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी येथे केले. माणगाव येथे शहीद वीर यशंवतराव घाडगे व्हिक्टोरीया क्रॉस मानचिन्ह धारक (मरणोत्तर) यांचा जयंती समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी घाडगे उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माणगाव प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप, प्रमुख अतिथी म्हणून कर्नल किशोरकुमार मोरे होते. तर उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी,घाडगे उत्सव समितीचे सचिव तथा तहसिलदार दशरथ काळे,वीर यशवंतराव यांचे वारसदार सुभाष घाडगे,माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील,गटशिक्षणाधिकारी सुरेख तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे,माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष सहादेव खैरे,माजी अध्यक्ष विष्णू सावंत,पोलादपूर माजी सैनिक संघटना अध्यक्ष वाय.सी.जाधव,माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती सभापती सुविधा खैरे आदींसह आजी-माजी सैनिक,पोलीस अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षकवर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केले. त्या पुढे म्हणाल्या की, माजी सैनिक यांच्या विश्रामगृहासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धतता करुन दिली जाईल. विश्रामगृहामध्ये वीर मरण आलेल्या सैनिकांची माहिती दिल्यास ती माहिती भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले. वीर घाडगे यांच्या वीर शौर्याची गाथा वर्तमान पिढीतील लोकांपेक्षा भावी पिढीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी पुढील वर्षी होणार वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती समारंभास माणगाव शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना बोलविल्यास ही शौर्याची गाथा भावी पिढीपर्यंत पोहचून हा समारंभ अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करता येईल असेही त्या म्हणाल्या.

यावेळी पोलादपूर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कर्नल किशोर कुमार मोरे, वाय.सी.जाधव, माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष सहादेव खैरे यांनी आपल्या मार्गदर्शनात शहीद वीर यशवंतराव घाडगे यां

संबंधित पोस्ट

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या; नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ;डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यातआरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम