vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानसभा कामकाज

मुंबई, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेली गोळीबाराची घटना कोणत्याही संघटित टोळीच्या कारवाईचा भाग नसून गैरसमजातून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत निवेदन करुन मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 7 मार्च 2026 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील अलमास कॉलनी परिसरात नदीम मोईनुद्दीन खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर शहाबाज उर्फ शबू मुन्ना शमशाद कुरेशी आणि एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. नदीम खान हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून त्यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरोपी आचार गल्ली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने पोलिसांवर आणि जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यास पकडले. या घटनेत जखमी इसमांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून दोन पिस्तुल, काडतुसे, मॅगझिन तसेच वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध दिल्लीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र कायद्यांतर्गत सुमारे 12 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तो ऑगस्ट 2025 मध्ये तिहार कारागृहातून जामिनावर सुटून काही महिन्यांपासून मुंब्रा येथे राहत होता. नदीम खान यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गैरसमज झाल्यामुळेच आरोपीने हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

या घटनेत कोणत्याही टोळीचा सहभाग अद्याप आढळलेला नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंब्रा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून ‘सुरक्षित ठाणे’ ॲपद्वारे देखील अधिक दक्षता घेतली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ठाणे पोलीस आयुक्तांना विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

०००००

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !**शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार !* 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta